Avsnitt
-
नवश्या मारुती ते सहकारनगर असा छोटासा प्रवास मला रोज चारवेळा करावा लागतो. आजुबाजूला बेदरकार गाडी चालवणारे, सतत चिडलेले, बारीकसारीक कारणांनी शिव्या देणारे व अत्यंत बेभरवशी लोक पसरलेले असतात. साहजीकच चिडचिड व त्रागा होत असे. पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग मी शोधला व तोच तुमच्याशी शेअर करायचाय.
#angermanagement #joy #littlejoy #vivekikatta #manachiyeguntee #traffic #roadrage #peace
-
अव्यक्त राग किंवा passive aggression नक्की घालवायचं कसं याबददल चर्चा करु या आपल्या विवेकी कट्ट्याच्या 'मनाचिये गुंती' आजच्या या सदरात.
#passiveaggression #angermanagement #vivekikatta #manachiyegunti #anger #expression
-
Saknas det avsnitt?
-
अव्यक्त राग किंवा passive aggression म्हणजे नक्की काय ते आपण गेल्या एपिसोडमधे समजून घेतलं. आता हे का निर्माण होतं, यामागची कारणं काय याबददल चर्चा करु या आपल्या विवेकी कट्ट्याच्या 'मनाचिये गुंती' आजच्या या सदरात.
#passiveaggression #angermanagement #vivekikatta #manachiyegunti #anger #expression
-
अव्यक्त राग किंवा passive aggression म्हणजे नक्की काय? ते कशाप्रकारे अनुभवायला मिळतं, कसं व्यक्त होतं याबददल चर्चा करु या आपल्या विवेकी कट्ट्याच्या 'मनाचिये गुंती' या सदरात.
#passiveaggression #angermanagement #vivekikatta #manachiyegunti #anger #expression
-
आयुर्वेद म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती पथ्यं आणि काढे. पण त्याच्याही पुढे जाऊन रोजच्या रोज अंगिकारता येणार आयुर्वेद शिकवतानाच, आयु्र्वेदाला निव्वळ एक जिवनशैली म्हणून मर्यादित न ठेवता एक चिकित्सापध्दती व अगदी सर्दी तापासारख्या तात्कालिक आजारांसाठीचा उपचार-पर्याय म्हणून समाजात स्थान मिळावं यासाठी विचार व प्रयत्न करणारी वैद्य स्वराली दामले-शेंड्ये
#ayurved #talk #treatment
-
आज आपण भेटत आहोत मूळची पत्रकार असलेली आणि आता पू्र्णवेळ अनुवादक म्हणून काम करणारी माझी मैत्रीण सायली गोडसे हिला. सायलीने आजवर जवळपास सत्तर पुस्तकांचा अनुवाद केला आहे. या प्रवासातले तिचे अनुभव ऐकू या 'अंतरीचा ज्ञानदिवा' या आपल्या सेगमेंट मधे.
#interview #sayaligodse #translation #अनुवाद
-
आजचा विषय आहे की परिक्षेच्या आधी आपल्याला टेन्शन का येतं ?
- फेल होऊ याची भीती (फेल म्हणजे ??)
- तयारीच झाली नसेल तर
- चांगलंच करायचंय
- अनिश्चितता
- बाह्य दडपण (पालक)
- सिध्द नव्हे युध्द
आपण परिक्षेला व त्यापुढे जाऊन आपल्या स्वत:कडे कसे बघतो त्यावर आपल्या भावना अवलंबून आहेत
#marathi #podcast #rational #thinking #anxiety #exam #tension
-
आज मराठी राजभाषा गौरव दिन... कवी कुसुमाग्रज यांची जयंती
विजयासाठी कविता माझी कधीच नव्हतीम्हणुन नव्हती भीती तिजला पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली
म्हणुन नाही खंतही तिजला मरावयाची
- कुसुमाग्रज
या चार ओळींत काय नाही?
कवीचा आपल्या कवितेवरचा, शब्दांवरचा, भाषेवरचा आणि त्यामधून मिळणार्या स्वानंदावरचा विश्वास तर आहेच... पण त्याहीपुढे जाऊन रोजच्या जगण्यात आपल्याला जखडून टाकणार्या कुंपणांना भेदणारी गुरुकिल्लीही आहे.
लोक काय म्हणतील? माझं हसं झालं तर काय होईल? प्रयत्न करुनही मी अपयशी ठरलो तर? चार लोकांसमोर मला नीट बोलता आलं नाही तर? अशा अनेक प्रश्नांमुळे, अविवेकी समजांमुळे आपण भीती, नैराश्य, लाजाळूपणा, भिडस्तपणा आणि आत्मविश्वासाच्या अभावाला जवळ करतो.
या चार ओळींमधला अर्थ समजून घेतला तर या भावनांना दूर करणे सहज शक्य होते. कुणावर विजय मिळवायचा, कुणासमोर आपली क्षमता सिध्द करायची, अमक्याने बरोबर म्हणले तरच आपण चांगले, चार लोकांना / समाजाला जे मान्य असते तेच योग्य... अशा अविवेकी विचारांनी आपल्या क्षमतांना आपण जखडून टाकतो, कुंपणं घालतो आणि इतरांनी चांगलं म्हणण्याची वाट बघत बसतो.
जगात रत्नपारखी कमी आहेत... अस्सल हिरा अज्ञानी माणसाच्या हातात पडला तर तो त्याला दगडच वाटतो, म्हणून तो हिरा नसतो का? आपण काय आहोत ते आपल्यालाच समजत नसेल तर इतरांना आपली खरी ओळख कशी होणार? इकिगाई मधूनही हेच तर सांगीतले होते... स्वत:ला समजून घ्या, आपला प्रवास आपला मार्ग आपला वेग आपली पध्दत इतरांपेक्षा वेगळी आहे हे लवकरात लवकर डोक्यात जाऊ दे. मग इतरांबरोबर आपली नाहक तुलना करणे बंद होते आणि स्वानंदाचे दार खुले होते.
-
फक्त दहावी बारावीच नाही तर अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांना आपण सामोरे जात असतो. आपली कितीही तयारी झाली असली तरी थोडा फार ताण येतच असतो. अशावेळी या ताणाला सामोरे कसे जावे, हा ताण नक्की येतो कोणत्या विचारांमधून, आणि यावर विवेकी विचारांनी कशी मात करता येईल याबद्दलचे एक सेशन. फक्त परीक्षार्थीच नाही तर सर्वांनाच उपयोगी पडेल असे...
-
ग्रीक भाषेमधे कालमापनेसाठी दोन शब्द ‘योजलेले’ आहेत - Chronos आणि Kairos
लेनीन म्हणे, “एखादे दशक काहीच घडत नाही, आणि एखाद्या आठवड्यात सबंध दशक घडून जातं” ...हाच तो chronos आणि kairos मधला फरक!#chronos #kairos #greek #time #moment #live #alive #thoughts #philosophy #
-
विवेकी कट्टाच्या 'अंतरीचा ज्ञानदिवा' या सदरात आज आपण भेटत आहोत माझा इन्स्टाग्राम मित्र कौस्तुभ जोशी याला. कौस्तुभचा डिझाईन स्टुडीओ आहे, ब्रॅंडींग व डिजिटल मार्केटींग यात त्याचे छान काम आहेच पण मला आवडते ती त्याची वाचनाची आवड व वाचलेले मांडण्याची स्टाईल. वेगवेगळ्या थोरामोठ्यांच्या जयंतीला त्यांच्याच साहित्यातले निवडक वाक्य वेचून इन्स्टा पोस्ट करणारा कौस्तुभ. हे तो इतकं छान करतो की अनेकदा त्याच्या पोस्टमुळे, एरवी ओळखीच्या असलेल्या त्या थोर व्यक्तीची एक वेगळीच ओळख समोर येते. कौस्तुभच्या https://www.instagram.com/iamkaustubhj/ या अकाऊंटला नक्की 'फॉलो' करा आणि आपले जनरल नॉलेज वाढवा.
#vivekikatta #antarichadnyandiva #interview #kaustubhjoshi #instagram #reader #presenter #design #branding #historian #modilipi #shivajimaharaj #ftii #filminstitute #creative #pixlplay -
'कॅलिडोस्कोप' - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यावाणी सामुदायिक रेडिओ साठी प्रसिध्द मुलाखतकार व निवेदक अपर्णा डोळे यांनी अमित करकरे यांची घेतलेली मुलाखत.
प्रथम प्रसारण दिनांक १ अॉगस्ट २०२२
सौजन्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यावाणी पुणे १०७.४ -
तंबाखू व्यसनमुक्ती व कौशल्य विकास यांसारख्या समाजपयोगी कामातून आपला ठसा उमटवणारे सोलापूरच्या रामचंद्र वाघमारे यांच्याशी मारलेल्या या गप्पा. अपयशाला संधी मानून वेळोवेळी स्वत:च्या खिशातून पैसे टाकून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही काम केलेले रामचंद्र. थोडा मोठा वाटेल एपिसोड पण शेवटपर्यंत ऐकलात तर नक्कीच एका छान व्यक्तीची ओळख झाल्याचे समाधान मिळेल हे नक्की.
रामचंद्रचा संपर्क क्रमांक : +919096426241
#vivekikatta #antarichadnyandiva #interview #saarathi #tobacco #deaddiction #solapur #ramchandra #socialwork -
कट्ट्यावरच्या 'अंतरीचा ज्ञानदिवा' या सदरात मी माझे मित्र, स्नेही व नातलगांशी गप्पा करीत त्यांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन व त्यातून मिळवलेल्या विवेकी विचारांबद्दल समजून घेतो. याच मालिकेत आजचे पाहुणे आहेत 'प्रॉफिशन्ट पब्लिशिंग हाऊस' चे अवधूत नांदुरकर. वडीलांकडून लाभलेला प्रकाशन व्यवसाय व त्याहूनही मोलाचा कर्म-विचार, एरवी अगदीच मितभाषी असलेल्या अवधूतकडून ऐकणे हा एक वेगळाच अनुभव होता.
-
तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलांसाठी GPS आहात की CCTV? महाराष्ट्र टाईम्स मधे २०१५ साली प्रसिध्द झालेला माझ्या लेखाचा हा सारांश. #rationalparenting #parenting #vivekikatta #rationalthinking #CCTV #GPS #demands #direction #comfort
-
कट्ट्यावरच्या या पहिल्या एपिसोडमधे पॉडकास्ट म्हणजे नक्की काय?आणि विवेकी कट्टा या आपल्या पॉडकास्टवर नक्की काय ऐकायला मिळणार आहे ते जाणून घेऊ या.