Avsnitt

  • श्री महालक्ष्मीची स्तुती करताना इंद्र म्हणतो, हे महामाया देवी! श्रीपीठावर देवांनी पूजन केलेल्या मी तुला नमस्कार करतो. हे महालक्ष्मी देवी! शंख, चक्र आणि गदा ही आयुधे तू हाती धरली आहेस. मी तुला नमस्कार करीत आहे. गरुडावर स्वार होऊन आल्याने कोलासुरासही तुझी भीती वाटत आहे. हे देवी, तुला माझे वंदन असो. हे देवी महालक्ष्मी, तू सर्व प्रकारची दुःखे दूर करणारी असून मी तुझ्या आज्ञांचे पालन करीत आहे. हे देवी! तू सर्व जाणणारी,  वरदान देणारी, सर्व दृष्टांना भय वाटेल अशी, सर्व दुःख दूर करणारी आहेस. मी तुला नमस्कार करतो. हे देवी! बुद्धिमत्ता, यश, ऐहिक उपभोग आणि मुक्ती देणारी अशी तू आहेस. हे माहेश्वरी देवी! तू आदि अंत नसलेली आहेस. तू योगिनी आहेस. तूच आद्यशक्ती आहेस. मी तुला नमस्कार करतो. हे महालक्ष्मी देवी, तू स्थूल आणि सूक्ष्म असून सर्व पापे दूर करणारी अशी आहेस. माझा तुला नमस्कार असो. हे महालक्ष्मी देवी, तू कमळावर विराजमान आहेस. तू विश्वाची माता आहेस. मी तुला नमस्कार करीत आहे. हे देवी! तू शुभ्र वस्त्रे परिधान केलेली असून विविध प्रकारच्या अलंकारांनी सजलेली आहेस. तू सगळ्या विश्वाचा आधार आहेस. मी तुला नमन करतो. या देवीचे हे स्तोत्र भक्तांनी अतिशय भक्तिभावाने वाचले, पठण केले तर त्यांना यश प्राप्त होईल. दिवसातून एकदा हे स्तोत्र पठण केल्यास मोठ्या पापांचा नाश होतो. हे स्तोत्र दोनदा वाचन वाचल्यास किंवा म्हणल्यास धन समृद्धी प्राप्त होते तसेच दिवसातून तीन वेळा म्हणल्यास म्हणजेच पठण केल्यास मोठे शत्रू नष्ट होतात अशी या स्तोत्राची फलश्रुती आहे. सर्व भक्तांवर श्री महालक्ष्मी सदैव प्रसन्न राहो.

    https://srujanrang.com

  • Saknas det avsnitt?

    Klicka här för att uppdatera flödet manuellt.